उस्मानाबाद/प्रतिनिधी-
डॉ.आंबेडकर सहकारी साखर कारखाना उभारणीच्या काळात आपण प्रर्वतक संचालक होतो, कारखाना उभारणीसाठी अथक परिश्रम घेतले. अवघ्या ३९ कोटी रूपयामध्ये कारखाना उभारणीच्या कामामध्ये मदत केली. पहिल्याच निवडणुकीत संचालक मंडळातून आम्हाला वगळण्यात आले. केवळ कारखान्याचे हित पाहिल्यामुळे आम्हाला वगळून नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या २० वर्षांत या कारखान्यावर २७४ कोटी ९८ लाख रूपयाचे कर्ज कसे झाले, याचे उत्तर चेअरमन अरविंद गोरे यांनी द्यावे, अशी मागणी डॉ.आंबेडकर शेतकरी सहकारी साखर कारखाना सभासद बचाव पॅनलचे प्रमुख अॅड.व्यंकट गुंड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे २०२०-२५ पंचवार्षीक संचालक निवडणुक कार्यक्रम सध्या सुरू झाला आहे. आंबेडकर कारखान्याचे चेअरमन अरविंद गोरे यांच्या विरोधात अॅड. व्यंकट गुंड यांनी पॅनल उभे केले आहे.गोरे यांच्यावर घणाघाती टिका करताना अॅड. गुंड यांनी गोरे यांचे संचालक मंडळ म्हणजे मुलासहीत जवळचे नातेवाईकच असतात, त्याचप्रमाणे ज्या गृहिनी महिला आहेत, त्यांनाही घेतले जाते. जेणेकरून आपल्या विरोधात कोणीही बोल शकणार नाहीत असे लोंक त्यांच्या पॅनलमध्ये असतात तर आमच्या पॅनलमध्ये विविध क्षेत्रातील काम केलेले तज्ञ लोक आहेत. कारखाना उभारणीसाठी आपण मदत केल्यानंतर कारखान्याच्या बैठकीत सोलापूर येथील सीए ची नियुक्ती करण्यासंदर्भात विरोध केला होता. त्याच प्रमाणे कारखान्याचे छपाई कामे आंबेजोगाईला देण्याऐवजी स्थानिकांना द्यावे, अशी मागणी केली होती. या सर्व बांबी संदर्भात गोरे यांना विरोध केल्यानंतर त्यांनी आम्हाला दुस-या पंचवार्षीक संचालक मंडळातून आम्हाला दुर ठेवले. आंबेडकर कारखाना विलासरांवाचा विकास कारखाना, बबनदादा शिंदे यांच्या रामजीशिंदे कारखान्याची एकाच वेळी उभारणी झाली. या कारखान्यांनी गेल्यावर्षी २६५० ते २५०० पर्यंत दर दिला. तर आंबेडकर ने २२६० रूपये दर दिला. यावर्षी कारखना जाणुनबूजन बंद ठेवण्यात आला आहे. आंबेडकर कारखान्यात सोलार प्लॉन्ट , डिस्टलरी प्लॉन्ट आदी चालु असून ते नफ्यात आहेत, असे असताना ही कर्ज कशामुळे झाले, याचे उत्तर जनतेला देणे आवश्यक आहे. कारखान्याचे ९ हजार ९०९ सभासद होते. तांत्रीक मुद्दे उपस्थित करून ४ हजार १७० सभासद पात्र आहेत, असे जाहीर केले आहे. कर्नाटकातून ऊस आणून सभासदाचे ऊस उशीरा घेऊन जाण्यामुळे सभासद शेतक-यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप गुंड यांनी केला. यावेळी ज्ञानदेव राजगुरू, चांगदेव माने, संजय कदम, दिलीप बुकन, सुर्यकांत लाकाळ, गोपाळ नळेगावकर, अॅड.निवृत्ती कुदळे आदींची उपस्थिती होती.

 
Top