उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पोलिस कल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लिटल स्टार प्राथमिक शाळेत क्रीडा सप्ताहाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांना पोलिस रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अश्विनी चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
पोलिस कल्याण शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत येथील लिटल स्टार प्राथमिक शाळेत दिनांक 12 ते 16 डिसेंबर 2019 या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा सप्ताहात विद्याथ्र्यांसाठी बेडूक उडी, 100 मिटर धावने, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, सायकल रेस, तिन टांगी दौड आदी विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
 या स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांना शुक्रवार, 27 डिसेंबर रोजी पोलिस रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. अश्विनी चौधरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून त्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दिपक भांगे, ए. आर. कांबळे, आर. एस. झोरे, एम. एम. इंगळे, श्रीमती पांचाळ, एस. व्ही. शिवणीकर, आर. एस. रेगुडे, एस. एस. डोके, आर. जी. पाटील, जे. एस. चौधरी, एस. ए. गाडगीळ, टी. बी. वाघमारे आदी शिक्षकासह विद्यार्थी, खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संजय लांडगे यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

 
Top