उस्मानाबाद/प्रतिनिधी-जिल्हा प्रशासनासह लोकसहभागातून शहरातील श्री तुळजाभवानी क्रक्रीडा संकुलात रविवारी (दि.17) श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. यावेळी अधिकारी, कर्मचा-यांसह भोसले हायस्कूल, भारतीय जैन संघटना, सुजलाम-सुफलामचाही उत्स्फूर्त सहभाग होता. मैदानातील कचरा गोळा करून परिसरातील घाण पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने उचलण्यात आली. यामुळे मैदान व परिसर स्वच्छ झाला असून महिन्यातून किमान दोन वेळा तरी अशी स्वच्छता होण्याची अपेक्षा नागरिकांतून होत आहे.
शहरात एकमेव श्री तुळजाभवानी क्रक्रीडा संकुल आहे. जीम सुरू केल्यापासून मैदानात येणा-या नागरिकांसह महिला, वयोवृध्दांची, खेळाडूसह लहान मुलांची संख्या वाढली आहे. या मैदानाची स्वच्छता करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह लोकसहभागातून रविवारी श्रमदान करण्यात आले. जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाने रविवारी (दि.17) श्री तुळजाभवानी क्रक्रीडा संकुल उस्मानाबाद येथे श्रमदान आणि स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत लोकसहभागही लाभला. निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, नगरपरिषद मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, तहसीलदार अभय मस्के, गणेश माळी, राजकुमार माने, नायब तहसीलदार केलूरकर, खोंडे, वनविभाग अधिकारी पवार, महिला बाल कल्याण अधिकारी अशोक सावंत, जिल्हा क्रक्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, सहाय्यक जिल्हा क्रक्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, तालुका क्रक्रीडा अधिकारी सारिका काळे, उस्मानाबाद हाफ मॅरेथॉनचे सर्व पदाधिकारी, खेळाडू, विद्यार्थी, विद्यार्थिनी, क्रक्रीडाप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.