जळकोट/प्रतिनिधी-राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान सन 2019 - 20 अंतर्गत व पंचायत समिती गणात ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधी विकास करण्यासाठी दिनांक 18 व 19 नोव्हेंबर 2019 या कालावधीत जळकोट तालुका तुळजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेतील हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दुपारी 12 : 30 वाजता करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, तुळजापूर पंचायत समिती उपसभापती सौ सुनीताताई अशोकराव पाटील, पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी साहेबलाल तांबोळी, जळकोटच्या सरपंच सौ अलकाताई हिंडोळे, ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ कांबळे, जिल्हा परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती टोणपे, हंगरगा( नळ) येथील ग्रामसेवक के. जी. पाटील, हंगरगा( नळ ) येथील कृषी सहाय्यक सौ प्रियंका पवार ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. उपस्थित कर्मचाऱ्यांना पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी साहेबलाल तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, ग्राम संसाधन गट , महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सदस्य, ग्रामसंघ, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्तरीय कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यशाळा दोन दिवस चालणार असून त्यामध्ये ग्रामस्तरावरील अडचणी, समस्या व त्यावर उपाय याबाबत साधक-बाधक चर्चा होऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन होणार असल्याचे यावेळी प्रास्ताविकात जळकोटचे ग्रामविकास अधिकारी जी. के. पारे यांनी सांगितले. कार्यक्रमास जळकोट ग्रामपंचायत सदस्य संजय अंगुले, गजेंद्र कदम, हंगरगा ( नळ ) येथिल ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (मुलांची) मुख्याध्यापक जगन्नाथ शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगरचे प्रभारी मुख्याध्यापक निळकंठ ईटकरी, हंगरगा( नळ ) चे ग्रामपंचायत सदस्य मोहन कांबळे ,जळकोटचे ग्रामपंचायत कर्मचारी विशाल जाधव, लहू कारले, बाबू राठोड आदींसह बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.