उमरगा/प्रतिनिधी-
 मानवाच्या कल्याणासाठी भगवान बुद्धांनी प्रज्ञा,शील,करुणेची शिकवण दिली.शिलाचे आचरण करून आपले जीवन सुखी करावे, शील हा नवसामाजाचा पाया आहे.आपले मन भौतिक सुखाच्या मागे धावत असते,मनाला काबूत ठेवण्याकरिता मनाला संस्कारित करणे गरजेचे आहे जो मनाला जिंकतो तो विश्वास जिंकतो असे प्रतिपादन बौद्ध धम्म गुरू पय्यावंश ( पूर्णा) यांनी केले.
उमरगा येथील न्यू पंचशील नगर येथे वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवारी दि 17 रोजी करण्यात आले होते या वेळी धम्म पीठावरून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा बँकेचे उपाध्याक्ष कैलास शिंदे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका ललिता सरपे,रामभाऊ गायकवाड, दिलीप भालेराव,प्रा. डॉ. एस.आर.वाघमारे,जिल्हा परिषद सदस्य दिग्विजय शिंदे,होळीचे माजी सरपंच दत्ताभाऊ गायकवाड धीरज बेळबकर
आदींची उपस्थिती होती. प्रारंभी भगवान बुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.धम्म ध्वजारोहण करून पाली पूजा घेण्यात आली.
पुढे बोलताना भंते पय्यावंश म्हणाले की, माणसांनी काया,वाचा,मनाने,कुशल कर्म करावे वाचेची शिले कायेची शिले व मनाचे शील यांचे आचरण केल्यास आपणास कोणीही शत्रू राहणार नाही सर्वत्र मित्र असतील व इतरांच्या कल्याणाची आपण सतत काळजी करावी जेणे करून आपले आचरण कुशल राहील.माणसाच्या जीवनाचं कल्याण करणारा हा बुद्ध धम्म आहे.माणसाने सदैव विनयाने वागले पाहिजे, प्रज्ञा शील करुणा चे आचरण करावे, प्रज्ञा जागृत ठेऊन आपले  काम करण्याने त्यांची प्रगती होते. जीवनात आसक्ती मोह द्वेश नष्ट करणे म्हणजेच शिलाचे  आचरण होय भगवान बुद्धांनी दिलेली पंचशील, अष्ट शील, दसशील,ही शिकवण आत्मसात करावी  असे आवाहन त्यांनी केले.आगामी काळात उमरगा परिसरात धम्माचे प्रशिक्षण देणारी केंद्र निर्माण करावेत यातुन सुजाण नागरिक तयार होतील,असे सांगितले या वेळी कैलास शिंदे यांनी अध्यक्षीय समारोप केला बौद्ध विहार निर्मिती साठी आम्ही प्रयत्न करीत असून सर्वजण या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यानी केले. या वेळी समाजातील गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला त्यात प्रा.डॉ. एम. टी. सूर्यवंशी, प्रा. डॉ.ए. सी. गायकवाड,प्रा.हिरालाल गायकवाड,माधव सूर्यवंशी,चंद्रकांत कांबळे,बबिता बालाजी राठोड,बाबा मस्के,माधव सुर्यवंशी, एम.डी.गायकवाड, मंगेश गायकवाड, शिवाजी गायकवाड, बाळू तिगलपल्ले, यांचा शाल फेटा बांधून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्तावित सुधीर कांबळे यांनी केले सूत्रसंचालन प्रा.मनोज सूर्यवंशी व कुमार कांबळे यांनी केले प्रा.ए.सी.गायकवाड यांनी आभार मानले कार्यक्रमास बालाजी गायकवाड, कुमार कांबळे, बलराज हिप्परगे, बाबासाहेब जाधव, प्रा संतोष सूर्यवंशी, प्रा रमेश जकाते,प्रा मनोज गायकवाड, यल्लप्पा मड्डे, प्रा बालाजी बोटेवाड, सुधीर कांबळे, बंटी गायकवाड, नामदेव सूर्यवंशी, शांताबाई गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.
 
Top