तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्रातील लातूर उस्मानाबाद जिल्हयात 1993 रोजी झालेल्या भुकंपात  तुळजापूर तालुक्यातील धनेगावचे प्रचंड नुकसान झाले होते. या गावचे कायदेशीर रित्या पुर्नवसन होण्यासाठी आगामी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रासस्थांनी बहिष्कार टाकण्याचा इशारा  जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे .
निवेदनात म्हटलं आहेकि 1993 च्या भुकपात गावची मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गाव गटनंबर 30 मधील प्रकाशराव देशमुख यांच्या शेतात जावुन राहिल्या नंतर तिथे शाषणाने शाळा घरकुल दवाखान रस्ते अंगणवाडी वीज यासह अनेक  शासकीय योजना राबवल्या गेल्याया प्रकरणी तत्कालीन तहसिलदार यांनी 1 ऑक्टोबर 1999 रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे पुर्नवसना बाबातीत प्रस्तुत पाठवला परंतु त्या बाबतीत कुठलीही कारवाई न झाल्याने 2014 लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला असता तहसिलदार यांच्या विनंती वरुन तो माघार घेतला पण कुठलीही कारवाई पुढे झाली नाही त्यानंतर दोन लोकसभा व पाच ते सहा ग्रामपंचायत निवडणुक व बहिष्कार टाकला आहे मागील विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिल्या मुळे बहिष्कार मागे घेतला परंतु परंतु अजुनही कुटलीही कारवाई न केल्याने सध्या होत असलेल्या 2019 च्या  ग्रामपंचायत पोटनिवडणुक वरही बहिष्कार  घालण्याचा निर्णय घेतला असुन यावर ग्रामस्थांच्या स्वाक्षि-या आहेत.
 
Top