तेर/प्रतिनीधी-तेर येथील कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुरातन वस्तुसंग्रहालय व ग्रामसेवा संघ तेर यांच्या संयुक्त विद्यमाने" तगर" महोत्सवातील "आपल्या वारसा स्थळाची स्वच्छता,राहतील अबाधित इतिहासाच्या खुणा" या अभियानाअंतर्गत तेर येथील पुरातन ञिविक्रम मंदीराची 17नोव्हेबरला स्वच्छता करण्यात आली.
या स्वच्छता मोहीमेत रेवणसिद्धप्पा लामतुरे, अमोल गोटे, किसन काळे, अविनाश राठोड, विलास देशमुख, सचिन मुंडे , स्नेहजित झरकर, अॅड.बालाजी भक्ते, डा. तानाजी काटे, नरहरी बडवे, अरविंद पाटील , विलास टेले, केशव सलगर, बालकृष्ण बडवे, तानाजी पिंपले , एस.यु.गोडगे , नवनाथ पांचाल, गोपाल थोडसरे, मनोहर राऊत, सुधाकर चव्हाण माधव मगर, सारंग पिंपले, सिद्धार्थ कसबे, अमर गोडसे, मयूर लोंढे , छोटू कोरबू , विजयकुमार इंगले सहभागी झाले होते.