उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बेंबळी येथील भाजपच्या सरपंच अर्चनाताई माने यांच्या विरोधात अखेर अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यावर त्यांच्या विरोधात 12 विरुद्ध एकने ठराव मंजूर झाला असून माने यांचे समर्थक तीन सदस्य गैरहजर होते. गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे.
गेल्या आठवड्यात सरपंच माने यांच्या विरोधात 12 सदस्यांनी एकत्र येऊन अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. यावर तहसीलदार गणेश माळी यांनी शनिवारी (दि. 16) विशेष बैठक बोलावली. दुपारी दोनला बैठकीला प्रारंभ झाला. तत्पुर्वी सहलीवर असलेले सर्व विरोधक 12 सदस्य दाखल झाले. यामध्ये उपसरपंच सत्तार शेख, मोहन खापरे, मिलींद पाटील, प्रकाश शेळके, शहजहान मुजावर, अहेमद शहा, माजी सरपंच लताताई रसाळ, नंदाबाई रसाळ, मायाताई रेडेकर, रुक्मिनी सोनटक्के, महामुदाबी शेख, वनमाला घोंगडे यांचा समावेश होता. यावेळी सरपंच माने यांना तहसीलदार माळी यांनी प्रश्न विचारले. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप वाचून दाखवण्यात आले. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. यानंतर तहसीलदार माळी यांनी हात वरुन मतदान होणार असल्याचे घोषित केले. मात्र, नंतर माने यांनी आक्षेप घेतल्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 12 मते पडल्यामुळे ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे माने यांना सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागले. प्रस्ताव पारित होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.