तुळजापूर/प्रतिनिधी- येथील जवाहर नवोदय विद्यालयात रविवार दि17 रोजी नवोदय माजी विद्यार्थी संघटना महाराष्ट्र शाखा मुंबई व नवोदय माजी विद्यार्थी सेवाभावी संस्था तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने "घे भरारी" कार्यक्रमअंतर्गत सेमिनार व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. एस. एच. गायकवाड,  श्री. एस. डी .खोब्रागडे, श्री .सी. एस. गोमारे, श्री .एस. जी. भोरगे, श्री एच .जी .जाधव, श्री . बी .आर. वंजारे, श्री डी .एस .देशमुख .सौ. एस.डी. वाघमारे, सौ .एस. आर. कराड, सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 या सेमिनार मध्ये डॉक्टर जितेंद्र पटेल दिल्ली ,रश्मी देशमुख पुणे ,उमेश वडजे नांदेड, कुलदीप पिल्लेवार मुंबई या शिक्षण तज्ञांचा समावेश होता. यामध्ये त्यांनी आत्मविश्वास कसा वाढवावा, सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा, ज्ञानार्जन कसे करावे, उत्तम वक्ता होण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, मनातील न्यूनगंड कसा कमी करावा, परिश्रमात कसे सातत्य ठेवावे, पैशा पेक्षा माणुसकी कशी सर्वश्रेष्ठ आहे, आत्मविश्वास कसा वाढवावा, जमिनीवर उभे राहून अर्थात वास्तवतेचे भान कसे ठेवावे या गोष्टींचा उहापोह या सेमिनारमध्ये या तज्ञांनी व्यक्त केला.
 घे भरारी या कार्यक्रमाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रमही विद्यालय परिसरामध्ये करण्यात आला. या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी नवोदय माजी विद्यार्थी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व कायदे तज्ञ श्री अमोल गुंड व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top