उस्मानाबाद/प्रतिनिधी-
शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी शनिवारी (दि.16) सकाळी आळणी येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आमदार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान, पीकविमा, शेतकऱ्यांसाठी बँकचे विषय व विविध योजना यासंदर्भात शेतकरी व ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेऊन लगेच तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, महावितरणचे अधिकारी, लाइनमन यांना कामे करण्यासाठी सूचना दिल्या. ज्या अडचणी जिल्हास्तरावरील होत्या त्या संबंधित अधिकारी यांना फोनवर सुचना केल्या. या बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, ग्रामसेवकाचे संजय लोमटे, ग्रामरोजगार सेवक दादासाहेब गायकवाड, लाईनमन काळे यांच्यासह गावातील शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय वीर, भाजपा तालुका उपाध्यक्ष रमाकांत लावंड, रवि कोरे आळणीकर, सुनील माळी, प्रसाद वीर, शामकुमार लावंड, शाखाप्रमुख अजित वीर, रंगनाथ कुदळे, अनंत खोबरे, विकास पाटील, धनंजय कापसे, मोहन वीर, राजपाल वीर आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top