तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस नवसपुर्ती पोटी अहमदनगर येथील देविभक्त दांम्पत्यांने देवीस पंचेवीस तोळयाचे  सोन्याचे बिस्किट रविवार दि18 रोजी देवीचरणी अर्पण केले.
सदरील भक्तांनी नाव न सांगता दहा -दहा तोळयाचे दोन व पाच तोळयाचे एक असे एकुण पंचवीस तोळे सोन्याचे बिस्किट अर्पण केले. या दाम्पत्यांचा मंदीर संस्थानच्या वतीने श्रीफळ व देविची प्रतिमा मंदीर संस्थानचे कर्मचारी विश्वास परमेश्वर कदम यांच्या हस्ते देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top