उमरगा/प्रतिनिधी-
शासनाने गोरगरीब रुग्णांना चांगल्या दर्जाची आणि तात्काळ सेवा मिळावी यासाठी रुग्णालय येथे 108 ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिली. मात्र डॉक्टर नसल्याने ही सेवा ठप्प झाली आहे. परिणामी रुग्ण व नातेवाईकांना खाजगी वाहनाने रुग्णालयात जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गा वरील उमरगा तालुक्याचे ठिकाण असल्याने परिसरातील गोर गरीब तसेच महामार्गा वरील अपघाता ‘या लहान मोठ्या घटनेतील रूग्णांना तातडीची सेवा मिळावी म्हणून शासनाने मागील पाच वर्षापूर्वी भारत विकास ग्रुप या खाजगी कंपनीला कंत्राट दिलेली 108 रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयाला दिली आहे. गर्भवती महिलेसह अपघात ग्रस्त, जळीत, विषारी दंश झालेल्या रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी सदर रुग्णवाहिकेचा उपयोग केला जातो. एखादा रुग्ण बेशुद्ध असेल तर आणि त्या‘यावर उपचार करणे अशक्?य असेल तर पुढील उपचारा साठी ताबडतोब रुग्णवाहिका उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने 108 रुग्णवाहिका सेवा सुरु केली आहे. सदर रुग्णवाहिके साठी एक चालक आणि सोबतीला तज्ञ डॉक्टरां ची नियुक्ती करण्यात आली. मात्र गेल्या दोन महिन्या पासून रुग्णवाहिकेला डॉक्टर नसल्यामुळे जाग्यावरच थांबून असल्याने अपघात व गर्भवती महिलांना ताबडतोब सेवा मिळत नाही. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. शासनाचे लाखो रूपये खर्चूनही सदरची रूग्णवाहीका असून अडचण नसून खोळंबा झाल्याने रूग्नालय परिसरात शोभेची वस्तू बनली आहे.