उस्मानाबाद/प्रतिनिधी-
 शहरातील वसंत गोरख घोडके याच्याविरोधात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी वसंत घोडके हा मागील तीन वर्षापासून सदरील महिलेस वाईट हेतूने त्रास देत होता, तिचा पाठलाग करत होता. मंगळवारी फिर्यादी महिला अंगणात काम करत असताना आरोपीने तिचा हात पकडला. यावेळी महिलेचा दीर सोडविण्यास आला असता आरोपीने दोघांनाही शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 
Top