उस्मानाबाद / प्रतिनिधी -
उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे कळंब येथील उप विभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटिल व पोलीस नाईक प्रताप बांगर यांनी कर्मचार्याना सोबत घेऊन अवैद्य हातभट्टी दारूच्या नऊ भट्ट्या उद्ध्वस्त करून दोन आरोपींना ताब्यात घेऊन अन्य सात जणांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ढोकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि उस्मानाबाद तालुक्यातील जागजी येथे अवैद्य दारूच्या हातभट्ट्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुरेश पाटील यांना समजली त्यांनी या विषयाची गंभीर दखल घेत रातोरात पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा घेऊन दिनांक 29 11 2019 (शुक्रवारी ) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास जागजी येथील लमान तांडा येथे पोलिसांचा सापळा लावला यात 9 अवैधरित्या गावठी दारू काढत असलेल्या भट्ट्या त्यांना दिसल्या त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले अन्य सात आरोपी पळून गेले परंतु त्यांचा मुद्देमाल व गावठी दारू काढण्यासाठी लागणारे साहित्य बॅरेल मोटार व हवा मारण्यासाठी भाते इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. पोलिसांनी जप्त तसेच गुळ मिश्रित रसायन जप्त करून नासधूस केली व काही मिश्रण सिल केले बॅरेल फोडून जप्त केले ही कार्यवाही स्वतः उप विभागीय पोलीस अधिकारी सुरेश पाटील यांनी केल्यामुळे परिसरातील अवैध दारू विक्री काढणाऱ्या धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईत एकूण चौसष्ठ हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कलम 65 (फ) 6683 महाराष्ट्र दारुबंदी अधीनीयम प्रमाणे पोलिस नाईक प्रताप बांगर यांनी तक्रार दिली आहे. यात १) भाऊ बाबू जाधव २) ग्यानदेव देविदास जाधव यांना अटक करण्यात आली आहे तर फरार झालेल्या आरोपीमध्ये ३) प्रकाश बळीराम आडे ४) रामराव गंगाराम आडे ५) माने गोविंद राठोड ६) विनायक गोविंद राठोड ७) गोपीनाथ पांडुरंग आडे ८) अंकुश वामन चव्हाण ९) उत्तम रुपा राठोड यांची नावे आहेत. या पथकात पोलिस उप विभागीय अधीकारी सुरेश पाटिल, पोलीस नाईक प्रताप बांगर ,विकास जगताप ,विवेकानंद गिरी, तसेच कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड सोबत ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बनसोडे ,कर्मचारी चिलवंत ,गवळी,कोतवाड यांच्यासह कर्मचार्यांचा मोठा ताफा होता. कळंब विभागाचे dysp सुरेश पाटिल यांची हि दुसरी मोठी कार्यवाही आहे यापुर्वी त्यांनी कत्तलखान्यात जाणाणारे गोवंश वाहतुक करत आसताना मोठी कार्यवाही केली आहे.त्यामुळे पाटिल हे सध्या कळंब विभागात सिंघम स्टाईलने कार्यवायांचा धडाका लावत असल्याने अवैद्द धंदेवाल्यांनी चांगलाच धसका घेतला आहे.