लोहारा/प्रतिनिधी-राष्ट्रीय पत्रकारदिनानिमित्त लोहारा शहरात सामाजिक कार्यकर्ते जालिंदर (भाऊ) कोकणे व श्रीगीरे हॉस्पीटल यांच्यावतीने डॉ.हेमंत श्रीगीरे यांनी पत्रकारांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर(भाऊ) कोकणे, बालाजी मक्तेदार यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, पत्रकार निळकंठ कांबळे,  बालाजी बिराजदार, गिरीश भगत, आब्बास शेख, अशोक दुबे, संतोष बायस, यशवंत भुसारे, गणेश खबोले, सुमित झिंगाडे, जालिंदर कोकणे, डॉ. हेमंत श्रीगिरे, बालाजी मक्तेदार, उमाकांत लांडगे, राम कुलकर्णी, गणेश हिप्परगेकर, अनिल येलुरे, खंडू सरवदे, यांच्यासह पत्रकार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top