उस्मानाबाद/प्रतिनिधी-येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धात्मक युगात नोकरीसाठी तयार असावा यासाठी १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसीय नोकरीपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात झाली. 
भोपाळ येथील माय परफेक्टिव्ह डॉट कॉमचे कॅम्पस ऑपरेशन मॅनेजर दीपक कुमार चौरासिया यांना निमंत्रित केले आहे. उद्घाटन सत्रासाठी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, विभागप्रमुख प्रा. उषा वडने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता प्राथमिक परीक्षेतून जाणून घेतली. त्यानंतर वेळापत्रकानुसार जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना सराव परीक्षेतून आपली क्षमता पडताळण्यासाठी याचा उपयोग होईल असे ट्रेनर चौरासिया म्हणाले. या प्रशिक्षण वर्गात प्रथम वर्ष अभियांत्रिकी व फार्मसीमधील सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यशस्वितेसाठी बेसिक सायन्स आणि फार्मसी विभागातील कर्मचारी कार्यरत आहेत. 



 
Top