कळंब/प्रतिनिधी-: रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी व कै.महादेव गव्हार क्रीडा मंडळ येडशी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२० नोव्हेंबर २०१९ ते २२ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत भव्य राज्यस्तरीय (खुला गट) अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केल्या आहेत.स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातून पुरुष व महिला यांचे जवळपास ५० संघाचे ७०० खेळाडू १०० पदाधिकारी कळंब शहरात दाखल होत आहेत. त्यांची निवास व जेवणाची व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेचे उदघाटन मा. आ. कैलास पाटील यांच्या हस्ते , मा. श्री. शिवाजी अप्पा कापसे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० नोहें २०१९ रोजी सायं. ४ वा होणार आहे. या कार्यक्रमासाठी मा. प्राचार्य डॉ. अशोक (दादा) मोहेकर, महाराष्ट्र राज्य आट्या - पाट्या मंडळाचे सचिव प्रा.डॉ.दिपक कवीश्वर, माजी. उपनगरध्यक्ष प्रा.डॉ. बाळकृष्ण भवर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष मा. बाळकृष्ण तांबारे,माजी तालुका क्रीडा समन्वयक श्री. लक्ष्मण तात्या मोहिते उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा दि. २२/११/२०१९ रोजी सकाळी १० वाजता मा. नगराध्यक्ष सौ.सुवर्णाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ.राणा जगजीतसिंह पाटील याचे हस्ते व नॅचरल शुगरचे चेअरमन कृषीरत्न बी.बी.ठोंबरे, रोटरी जिल्हा ३१३२ चे २०१९-२० चे प्रांतपाल रो. हरीश मोटवानी, २०२०-२१ चे प्रांतपाल रो. डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे, कळंब न.प. चे गट नेते प्रा. श्रीधर भवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेची सर्वे तयारी पूर्ण झाली असून या स्पर्धा पाहण्याचा आनंद कळंबकरानी घ्यावा अशी विनंती उस्मानाबाद जिल्हा आट्या - पाट्या संघटनेचे अध्यक्ष श्री. राजकुमार सोजवंशी, सचिव शरद गव्हार, सल्लागार प्रा. संजय घुले, रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे अध्यक्ष रो. हर्षद अंबुरे, सचिव रो. प्रा. डॉ. हनुमंत चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन रो. विश्वजित ठोंबरे, श्री. अनिल शिंदे, श्री. राजाभाऊ शिंदे, प्रा डॉ बाळकृष्ण भवर, संदीप बावीकर, रो डॉ गिरीष कुलकर्णी, रो.अरविंद शिंदे, रो.वैजनाथ पकवे,श्री. परमेश्वर मोरे, शंकर माने,श्री.सुनील बोरकर यांनी छ. शिवाजी महाविद्यालयांत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर्थीक मदत रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, रण सम्राट शारीरिक शिक्षण संस्था,दोस्ती ग्रुप,नॅचरल शुगर कारखाना रांजनी यांनी केली.