उमरगा/प्रतिनिधी-
 भारतीय संविधानाने देशवासियांना स्वातंत्र्य, समता,बंधुतेची महान शिकवण दिली आहे. संविधानाणे  देशातील प्रत्येक भारतीयांना सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली असून खऱ्या अर्थाने समता नांदत आहे.असे मत कैलास शिंदे यांनी व्यक्त केले.
उमरगा येथील न्यू पंचशील नगर येथे मंगळवारी दि 26 रोजी सकाळी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन रामराव सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री शिंदे बोलत होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून संविधाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमास प्रा.डॉ.ए.सी.गायकवाड, प्रा.डॉ.मिलिंद सूर्यवंशी, प्रा मनोज सूर्यवंशी, प्रा. संतोष सूर्यवंशी, प्रा.बालाजी बोटेवाड, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले संविधान प्रास्ताविकेचे वाचन बाबासाहेब जाधव यांनी केले आभार बलराज हिप्परगे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता पंढरी गायकवाड, राम सुरवसे, विजयकुमार कांबळे,आम्रपाली कांबळे, कमलाबाई कांबळे,रमाबाई सोनकांबळे, शांताबाई गायकवाड, आदींनी परिश्रम घेतले.
 
Top