तुळजापूर/प्रतिनिधी-
खरीप हंगाम 2019 चा पिकविमा मंजुर करुन  तात्काळ वितरीत करण्याची मागणी करून पंधरा दिवसाचा आत रक्कम न दिल्यास पिकविमा कंपनी विरोधात मा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात  याचीका दाखल करण्याचा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिका-यांना निवेदना द्वारे दिला आहे.
तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसामुळे शेतक-यांचे अतानोत नुकसान झाले आहे. आता रबी पेरणीसाठी शेतक-यांना पैशाची गरज असल्याने पंधरा दिवसाचा आत पिकविमा मंजूर करुन द्यावा अन्यथा मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचीका दाखल करणार असल्याचे निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिलाध्यक्ष रविंद्र इंगले, उपाध्यक्ष धनाजी पेंदे, तहसीलाध्यक्ष दुर्वास भोजणे  एड. उदय भोसले, बापु नन्नवर, इरप्पा आरके, विष्णू गाटे, राजाभाऊ हाके, शहाजी जगदाळे, शरद जगदाळे, हणमंतराव मोरे,  प्रदीप भोजणे, देवबा टकले आदींनी दिले आहे.

 
Top