उस्मानाबाद/प्रतिनिधी-
तुळजापूर नगरपालिकेतील तत्कालीन लेखापाल, भांडारपालासह इतरांनी पाणीपुरवठा कामाकरिता लागणाऱ्या साहित्याची खरेदी न करता त्याची बनावट बिले काढून शासकीय रक्कमेचा अहपार केल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 7 एप्रिल 2012 ते दि.8 जानेवारी 2015 या कालावधीत घडला असून स्थानिक निधी लेखा परीक्षकांच्या तपासणीतून समोर आलेल्या या प्रकरणातून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पालिकेचे अंतर्गत लेखापरीक्षक राहुल मिटकरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.7 एप्रिल 2012 ते 8 जानेवारी 2015 या कालावधीत तत्कालीन भांडारपाल पी.एल.कदम व लेखापाल ए.एन.राऊत यांच्यासह इतरांनी तुळजापूर पालिकेच्या पाणीपुरवठा साहित्याच्या खरेदी केलेल्या बनावट पावत्या सादर करून कोणतेही साहित्य खरेदी न करता सदरील रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. याबाबत स्थानिक निधी लेखा परीक्षकांनी आपल्या अहवालात सदरील बनावट प्रकार स्पष्ट करत याप्रकरणी संबधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून सदरील रक्कम वसुल करण्याची शिफारस केली होती. यातील एकूण किती रक्कमेचा अपहार झाला, फसवणूक झाली हे समोर आलेले नसले तरी झालेला प्रकार समोर आल्यावरून जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपहारीत रक्कम किती याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.