उस्मानाबाद/प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील येरमाळा येथे बार्शी रोडवर सापडलेल्या एका 11 वर्षीय मूकबधिर मुलीस येरमाळा पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांचा शोध घेत तिला कुटुंबीयांकडे सूपूर्द केले. पोलिसांच्या या कार्यतत्परतेमुळे सदरील मुलगी कुटुंबीयांकडे परत पोहचल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
येरमाळा येथे दि.13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बार्शी रोडवर येरमाळा पोलिस पथकास एक छोटी मुलगी एकटीच भटकंती करताना आढळून आली.यावेळी पोलिसांनी तिच्याकडे विचारपुस करण्याचा प्रयत्न केला असता ती मूकबधिर असल्याने तिची ओळख पटविणे अवघड झाले होते. यावेळी पोलिसांनी पारधी व कन्नड भाषा येणाऱ्यांना बोलावूनही तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ओळख पटविण्यात यश येत नव्हते. तिला कागद- पेन दिला असता ती एबीसीडी, 1234 एवढेच लिहित होती. दरम्यान, येरमाळा पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांनी तिचे छायाचित्र काढून व्हॉट्सअॅपद्वारे विविध ग्रुपवर प्रसारित करून माहिती दिली. तसेच तिला ओळखणाऱ्यांनी येरमाळा पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. हा संदेश व छायाचित्र पांगरी पोलिस ठाणे (जि.सोलापूर) येथील कर्मचारी यांनी बघितले. त्यांनी तत्काळ येरमाळा पोलिस ठाण्याशी संपर्क साधुन ही मुलगी मूकबधिर असुन तिचे नाव माला सुरेश शिंदे (वय 11 रा. पाथरी, ता.बार्शी) येथील आहे. तसेच ती बेपत्ता झाल्यासंदर्भात बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल असल्याचे सांगितले. त्यानंतर येरमाळा पोलिसांनी बार्शी पोलिसांशी संपर्क साधून माहिती घेतली. यामध्ये सदरील मुलगी दि.12 रोजी सकाळी पाणी आणण्यासाठी बाहेर गेली ती परत न आल्याने तिच्या आजोबांनी बार्शी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार बार्शी पोलिसांनी तिच्या नातलगांना माहिती दिल्यानंतर गुरूवारी (दि.14) आजोबा व नातलगांनी येरमाळा येथे आल्यानंतर पोलिसांनी सदरील मुलीस त्यांच्या नातलगांकडे सूपूर्द केले.