उस्मानाबाद/प्रतिनिधी :- जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत आठ तालुक्यातील 150 ग्रामपंचायतमध्ये स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या "एलईडी शो प्रदर्शित करणाऱ्या वाहनाचे" जिल्हा परिषद, उस्मानाबादचे अध्यक्ष श्री नेताजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आणि अति. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री.अनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन करण्यात आले.
 
Top