उमरगा/प्रतिनिधी-
तालुक्यातील रामपूर पाटी जवळील येळी शिवारात गांजाचे 68 बंद पाकिट ज्याचे वजन 144 किलो आढळून आले असून ज्याची अंदाजे किंमत 10 लाख 8 हजार रुपये आहे. हि घटना राष्टीय महामार्गावर रामपूर पाटी जवळ शुक्रवार (दि. 15) रोजी सकाळी उघडकीस आली असुन पोलिसांनी घटना स्थळी भेट देवून पंचनामा व मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुध्द रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यात रामपूर पाटी जवळ येळी शिवारात अज्ञात आरोपींनी पोत्यात पॅक केलेल्या गांजा टाकुन गेल्याचे शुक्रवारी (दि. 15) रोजी सकाळी येळी येथील शेतकरी शेताकडे गेले असता त्यांना शेतात बेवारस पाकिटे असल्याचे दिसुन आले. याबाबत त्यांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस पाटलांनी सकाळी 11 च्या दरम्यान भ्रमणध्वनी वरुन उमरगा पोलिसांना याची माहिती दिली. याबाबत माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक साध्देश्वर गोरे यांनी हेड कॉन्स्टेबल कांतु राठोड, नागनाथ वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल सुरज गायकवाड, उत्कर्ष चव्हाण, चालक मेटे पोलिस कर्म-यांना पथकाने घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. यावेळी त्यांना 68 गांजाचे पॉकेट आढळून आले. सदरील पॉकेटचे वजन केले असता 144 किलो गांजा असल्याचे दिसून आले. ज्याची अंदाजे किंमत 10 लाख 8 हजार लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी सपोनि सिद्धेश्वर गोरे यानी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात व्यक्ती विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि धुळे या करीत आहेत.