तुळजापूर/प्रतिनिधी-
तीर्थक्षेत्र तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मूळ जागी तातडीने बसवून सुशोभीकरण करा, अन्यथा पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा शिवभक्तांनी दिला आहे.
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी 19 जानेवारी 2018 रोजी जागेवरून हलवण्यात आला. मात्र, जवळपास 10 महिन्यानंतर छत्रपतींचा पुतळा सुशोभीकरणाचे काम रखडलेलेच आहे. यामुळे शिवभक्तांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. पुतळा सुशोभीकरणाच्या कामास विलंब झाल्यास पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर महंत ईच्छागिरी, अॅड. जनक पाटील, कौस्तुभ जेवळीकर, गणेश खानवट्टे, दीपक पलंगे, दिनेश कदम, विरेंद्र कांबळे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, विनायक माळी, जयकुमार पांढरे, विशाल मगर, सुदर्शन वाघमारे, अभिजीत छत्रे, शुभम लोंढे, परशुराम पेंदे, अजय भोसले आदींच्या स्वाक्षरी आहेत.

 
Top