तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुलंग्रहालय,तेर व तगरनिवासी यांच्या संयुक्त विद्यमाने 14 नोव्हेबर ते 23 नोंव्हेंबर पर्यंत "तगर" महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
14 नोव्हेबरला संग्रहालय स्थापना दिन असून शालेय विद्यार्थ्यासाठी चिञकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी  तहसिलदार गणेश माळी,देवगिरी प्रांत इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष प्रा.डाँ.राधाक्रष्ण जोशी,महाजन महाविद्यालयीच्या इतिहास विभाग प्रमूख प्रा.जयश्री कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थीती राहाणार आहे.17 नोव्हेंबरला आपल्या वारसा स्थळाची "स्वच्छता" कार्यक्रम असून,19 नोव्हेबरला शालेय विद्यार्थ्यासाठी "चलो दोस्तहो,सुवर्णनगरी तगरवर बोलु कांही"या विषयावर वक्रत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.21 नोव्हेबरला "तगर प्रदक्षणा-वारसा फेरी"चे आयेजन करण्यात आले आहे.22 नोव्हेबरला "ब्राम्ही लिपी एक दिवशीय" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेआहे.21 ते 23  नोव्हेबर पर्यंत "विश्वविख्यात तगर "लक्ष्मी"चे विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.21 ते 22 नोंव्हेबरला तगर दर्शन -तगरच्या ऐतिहासीक वारसा स्थळाची सफर आयोजित करण्यात आलेली आहे.21 ते 22 नोंव्हेबरला "प्रकाशमान करू या आपला वारसा"उपक्रमाअंतर्गत श्री.ञिविक्रम मंदिर दोन दिवस सायंकाळी प्रकाश योजना करण्यात येणार आहे.23 नोंव्हेबरला "वारसा जपण्यात लागला हातभार ज्यांचा,चला करू सन्मान तयांचा"या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या तगर महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन तगर अभ्यासक रेवणसिद्धअप्पा लामतुरे,संग्रहालयाचे  सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यानी केले आहे.
 
Top