तेर/प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंनी दिनांक 12 रोजी  लातूर येथे पार पडलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी आपले वर्चस्व कायम राखत घवघवीत यश संपादन केले .
जिल्हा क्रक्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या वतीने मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी क्रक्रीडा संकुल लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत तेर (ता. उस्मानाबाद ) येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील गोरे राधा गोरोबा, पिंपळे प्रतिक्षा संतोष, दंडनाईक आसावरी सतिश, जाधवर प्रणिता विजयकुमार, चौहान नंदीनी रणजितसिंह या खेळाडूंनी लांब उडी, भाला फेक , उंच उडी , हर्डल्स , 4 म 100 बॅटन मीटर रिले आदी क्रक्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करत विभागीय स्पर्धेत आपले वर्चस्व कायम राखत घवघवीत यश संपादन केले.  यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रक्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सर्व यशस्वी खेळाडूंची सातारा येथे होणा-या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक एस .एस. बळवंतराव यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला .
यावेळी एम .एन .भंडारे  , जे .बी .बोराडे , डी .डी .राऊत , आर. एम .देवकते , एम. एन .शितोळे , ए. एन .रणदिवे , एस .यू .गोडगे, ए. डी. राठोड , एम .डी .नंरसिगे , एस. बी .पाटील , ए. बी .वाघेरे , ए .बी. नितळीकर , एस .डी. घाडगे , महंमद बागवान , एम. एल .कांबळे , खटींग सुर्यकांत , काळे ज्ञानेश्वर, मुळे जे. ए., सतिश भालेराव ,  दिपाली व्यास, विजयकुमार जाधवर आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top