उमरगा/प्रतिनिधी-खेळामुळे उत्तम आरोग्य राहते , शारीरिक , मानसिक व बौद्धिक विकास होण्यासाठी खेळाचे अनन्यसाधारण महत्व आहे . खेळामुळे आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर निरोगी राहते . क्रीडा क्षेत्रात सुद्दा करीयर करण्याच्या भरपुर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे विद्याथ्र्यांनी अभ्यासाबरोबर खेळावर लक्ष केंद्रित करुन आपले करीअर घडवावे असे मत तालुका क्रीडा अधिकारी सारीका काळे यांनी व्यक्त केले .
जिल्हाक्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा ज्युदो असोसिएशन यांच्या वतीने उमरगा येथील बहुजन हिताय वसतिगृहातील  सभागृहामध्ये आयोजित लातूर विभागीय शालेय ज्युदो स्पर्धेचे उदघाटन तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे यांच्या हस्ते दि. 21 रोजी  करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे प्रकल्प प्रमुख धम्मचारी प्रज्ञाजीत होते, यावेळी म. रा. परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी, उस्मानाबाद जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव प्रविण गडदे, क्रक्रीडा भारतीचे, उस्मानाबाद ज्युदो संघटनेचे प्रताप राठोड, प्रभाकर जाधव, नांदेड ज्युदो संघटनेचे रवीकुमार बकवाड, उमरगा तालुका क्रीडा संयोजक राजेंद्र सोलंकर, महेश जाधव, अविनाश पाटील, प्रभाकर खरमाटे आदींसह जुडोपट्टू, मार्गदर्शकांची प्रमुख उपस्तीथी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनीर शेख यांनी, प्रास्ताविक प्रताप राठोड यांनी तर आभार नेताजी जाधव यांनी मानले.
स्पर्धेत रवीकुमार बकवाड, प्रताप राठोड, कैलास लांडगे, नेताजी जाधव, विशाल पवार, आनंद गवळी यांनी पंच म्हणून काम पहिले. स्पर्धेत उस्मानाबाद, लातूर शहर व ग्रामीण, नांदेड शहर व ग्रामीण 14, 17 व 19 वर्षे वयोगटातून 200 खेळाडू सहभागी झाले होते.14 वयोगटातील मुली कु.प्रतिक्षा राठोड, श्रेया होंडरे , समृद्धी पवार , 17 वयोगटातील मुली/मुले - सुहानी घोडके , तहजीब  शेख, वैष्णवी गनापूरे, अस्मिता पाटील, श्राद्ध कांबळे , रोहन गनापूरे , ओम राठोड , साई राठोड , नवतेज माने , वयोगटातील मुले/मुली - स्वाती कोळी , रोशन राठोड , साईप्रसाद  राठोड , सुमूक साळुंखे आदीनी यश संपादन केले. या स्पर्धेतून विजेते खेळाडू राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेसाठी आपापल्या वजनी गटातून लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
 
Top