उस्मानाबाद/प्रतिनिधी-उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी करण्यासाठी तज्ञांच्या समितीने आज जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट दिली. या समितीमध्ये डॉ.चंद्रकांत दौडे, डॉ.सुषमा जाधव, डॉ.मंगेश शेलूकर व डॉ.सौ.नन्नवरे मॅडम यांचा समावेश होता. या समितीची माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, यांच्यासह भेट घेवून उपलब्ध सोयी सुविधांबाबत चर्चा केली.
माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचा वैद्यकीय संचालक डॉ.तात्यासाहेब लहाने तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.गिरीष महाजन यांच्याकडे तज्ञांची समिती गठीत करुन लवकरात - लवकर अहवाल भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडे पाठविण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. समितीला अहवाल सादर करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असली तरी 2-3 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी समिती सदस्यांना दिल्या. ऑक्टोंबर अखेरपर्यंत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेला अहवाल सादर करणे अभिप्रेत असून पुढील शौक्षणिक वर्षापासून उस्मानाबाद येथे शासकीय वौद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.गंलाडे, तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुनिल पेठकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वडगावे, डॉ. धनंजय पाटील, कार्यकारी अभियंता श्री.सगर यांच्यासह नगरसेवक युवराज नळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा पं.स. सदस्य प्रदिप शिंदे, मनोगत शिनगारे, अॅड.नितीन भोसले, इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते.