तेर /प्रतिनीधी-  प्रत्येकानी मनातील कचरा काढून टाका हीच  स्वच्छता असे प्रतिपादन साहीत्यिक व पञकार रवी केसकर यानी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे ग्रामसेवा संघांच्या प्रथम वर्धापनानिमीत्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी केसकर बोलत होते.अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प.दिपक खरात होते तर पुणे येथील गुंज संस्थेचे कार्यवाहक अजित कांकरीया,उस्मानाबाद येथील एकता फाऊंडेशनचे सचिव अभिलाश लोमटे, अँड.गजानन चौगूले,तेर ग्रामसेवा संघांचे अध्यक्ष अँड.बालाजी भक्ते   यांची प्रमुख उपस्थीती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी पिंपळे यानी केले तर सुञसंचलन नवनाथ पांचाळ यानी केले तर डाँ.तानाजी काटे यानी आभार मानले.सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या खेड येथील ग्रामसेवा संघ,डकवाडी येथील जलयुक्त शिवार समिती तसेच ग्रामसेवा संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील प्रथम विजेते प्रणाली कोकरे,व्दितीय अनिरूद्ध कुलकर्णी,ञतिय दिशा मगर तर चिञकला स्पर्धेतील प्रथम विजेते अलिना मोमीन,व्दितीय अंजली काळे,ञतिय श्रावणी बुके या विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमासाठी केशव सलगर,नरहरी बडवे,मयुर लोंढे,अमर गोडसे,माधव मगर,काकासाहेब भोंडवे,रविंद्र शेळके,विलास टेळे,गोपाळ थोडसरे,राजेंद्र माने,भगवंत सौदागर,सारंग पिंपळे,न्यानेश्वर खरात,महेश गोडगे,रीतेश चव्हाण,नागेश लोमटे,सागर भक्ते,मेघराज भक्ते,अविनाश  डीगे यानी परीश्रम घेतले.
 
Top