लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील जय जगदंबा नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षपदी हरी लोखंडे उपाध्यक्ष राहुल रेणके, कोषाध्यक्ष प्रशांत लांडगे, सचिव दत्ता स्वामी, प्रसिद्धीप्रमुख प्रेम लांडगे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि.२२ रोजी शहरातील जगदंबा मंदिरात वि.वि.सोसायटी चेअरमन प्रशांत लांडगे यांच्या अध्यक्षते खाली पार पडलेल्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.गेल्या ४६ वर्षांपासून जय जगदंबा मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो.यावर्षी हि नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला विजय महानुर, सुनील देशमाने, श्रीशैल स्वामी, सुनील ठेले, बाळु माळी, प्रशांत जाधव, पंडित लोहार, बाळु माशाळकर, अनिल ठेले, मंगेश बनशेट्टी, आपाराव पवार, नागनाथ जाधव, संभाजी विरुदे, शिवकुमार पाटील, राहुल विरुदे, महेश कुंभार, नितीन पवार, प्रवीण कदम, बाबा जाधव, श्रीकांत तिगाडे, अक्षय लोहार, अनिल विरुदे, अदि उपस्थित होते.
 
Top