लोहारा/प्रतिनिधी-लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय व गटशिक्षण कार्यालय लोहारा यांच्या सुयक्त विद्यमाने जागतिक स्वच्छता दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली. 
या रँलीचे उदघाटन प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आपला परीसर स्वच्छ ठेवत असताना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे जेणेकरून आपले आरोग्य उत्तम राहू शकते असे, यावेळी प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी सांगीतले. यावेळी विद्यार्थ्यांनी शहरात स्वच्छतेच्या घोषणा मोठ्या प्रमाणात देऊन स्वच्छतेचा संदेश देवुन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. याप्रसंगी पर्यवेक्षक भास्कर जाधव, धनराज धनवडे, बालाजी विरुधे, दत्ताजी जावळे पाटील, श्रीकांत मोरे, संजय जगताप, नागनाथ पांढरे यांच्यासह विध्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top