उस्मानाबाद/प्रतिनिधी-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आज २४सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॅ.डी.बी.मोरे (तेरणा महाविद्यालय होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख होते.प्रारंभी प्रमुख मान्यवरांनी डाॅ.बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे आणि महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना प्रा.डाॅ.डी.बी.मोरे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेत काम करणारे जे विद्यार्थी असतात ते स्वयंसेवक म्हणून आपला वेळ काढून समाज जागृती करतात व देशहिताला वाहून घेतात.नैसर्गिक आपत्ती आल्यास मदतीला धाऊन जातात.समाजसेवा करतांनाचा त्यांच्यात आत्मविश्वास वाढायला लागतो आणि त्यातूनच त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास घडतो.यावेळी त्यांनी एन.एस.एस.ची स्थापना कशी झाली याचा इतिहास सांगितला.व या विभागात चांगले काम करून आपल्या व्याक्तीमत्वाचा विकास साधावा असे आवाहान केले.
अध्यक्षीय समारोप करतांना प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख म्हणाले की,आज आपल्या परिसरातील समाजात व्यसनाधिननता खुपच वाढली आहे.यात तरूण वर्गच आघाडीवर आहे.या तरूणांना व्यसनाधिनतेपासून अलिप्त करण्याचे काम एन.एस.एस.मधील युवकच करू शकतात.यावेळी त्यांनी महाविद्यालयातील एन.एन.एस.विभागाच्या कार्याचा आढावा घेतांना म्हणाले की,३०सप्टेंबर १९९३साली किल्लारी व लातूरला भूकंप झालता त्यावेळी एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी सास्तूरला मोठे काम केले होते याची परंपरा आजच्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवावी असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्रकल्पअधिकारी प्रा.एस.जी.नागरगोजे यांनी केले .सुञसंचालन प्रा.माधव उगीले यांनी केले.यावेळी प्रा.राजा जगताप,प्रा.शिवाजी गायकवाड,प्रा.मारूती लोंढे,प्रा.बालाजी नगरे ,प्रा.हातागळे उपस्थित होते.
आभार प्रा.मोहन राठोड यांनी मानले.
यावेळी एन.एस.एस.विभागातील सर्व स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते.