जळकोट /प्रतिनिधी-जळकोट तालुका तुळजापूर येथील सेवानिवृत्त शिक्षक सामलिंग नुरूंदय्या स्वामी (74) वर्षे यांचे अल्पशा आजाराने दि. 10 सप्टेंबर रोजी सोलापूर येथील खासगी रूग्णालयात सकाळी आठ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने स्वामी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी चार वाजता पार पडला. अंत्यविधीस राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांसह नातेवाईक ,हितचिंतक व मित्रपरिवारासह हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना ,मुली, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. शिवा संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य शासकीय-निमशासकीय लिपीक संवर्गीय कर्मचारी संघटनेचे मराठवाडा विभागीय संघटक सातलिंग स्वामी व लोहारा येथील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे उपप्राचार्य वीरभद्रेश्वर स्वामी यांचे ते वडील होते.