उस्मानाबाद / प्रतिनिधी- डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कँपस,गडपाटी उस्मानाबाद येथे धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्काराचे थाटात वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी हे होते.तर प्रमुख पाहूणे म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,अॕड अनिल काळे,अॕड.व्यकंटराव गुंड,धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा भाजपा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील,भाजपा मिडीयासेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, नगरसेवक राहूल काकडे,भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते,कळंब पत्रकारसंघाचे विश्वस्त सतिश टोणगे,स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष परमेश्वर पालकर यांची  व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील २० शिक्षकांचा व जि.प.प्रा.शाळा घारगाव या शाळेचा आदर्श शाळा म्हणून धनेश्वरी शिक्षण समूहाच्या वतीने गौरव करण्यात आला.यावेळी धनंजय रणदिवे यांनी पाटील कुटूंबियांनी माळरानावर शैक्षणिक बाग फुलविल्याचे सांगितले तर अॕड.अनिल काळे यांनी डॉ.प्रतापसिंह पाटील हे
दांपत्य डॉक्टर असताना देखील त्यांनी शैक्षणिक सेवा करत असल्याबद्दल कौतूक केले.तसेच अॕड.व्यकंटराव गुंड यांनी शिक्षक चुकला तर समाज चुकतो असे सांगत शिक्षकांचे महत्व सांगितले. नितीन काळे यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी करत भाजपा शासन हे शिक्षकांच्या पाठीमागे आहे अस सांगत डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी शिक्षक पुरस्कारात देखील सामाजिक सलोखा कायम राखला असल्याचे सांगितले.
  अध्यक्षीय समारोप करताना भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, धनेश्वरी शिक्षण समूहाने पुरस्कार वितरण सोहळा करुन शिक्षकांच्या पाठीवर जी शाबासकीची थाप टाकली आहे ती नक्कीच प्रेरणादायी ठरेल अस सांगत गुरु म्हणजे केवळ वर्गात शिकवणारा नसतो तर जो-जो आपल्याला मार्गदर्शन करतो तो गूरु असतो असे म्हणाले.यावेळी पुरस्कारप्राप्त शिक्षकांमधून चंद्रकांत तांबे,प्रशांत जाधवर यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी करताना सांगितले की,धनेश्वरी शिक्षण समूह हा ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करणारा समूह आहे.तसेच भविष्यात देखील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणा-याच्या पाठीवर थाप टाकण्याचे कार्य आमच्याकडून होईल.पुढील वर्षापासून धनेश्वरी शिक्षकरत्न पुरस्कार हा भव्यदिव्य होईल असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.सतिश मातने व प्रा.डी.व्ही.सुतार यांनी केले तर आभार प्राचार्य सुरज ननवरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.कैलास मोटे,प्रा.महेश शिंदे.प्रा.अमर कवडे,प्रा.तुषार वाघमारे,हरि घाडगे, दत्तात्रय घावटे,प्रा.आशिष उंबरे,अशोक सोन्ने,रामप्रसाद गंगाधर,अशोक जगताप,सागर वीर यांच्यासह सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


धनेश्वरी शिक्षण समूह हा नेहमीच चांगल्या गोष्टीच्या मागे उभा राहतो.शिक्षकांनी देखील अद्ययावत राहून अध्यापन केल्यास आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण चांगले राहील म्हणून शिक्षक पुरस्कार वितरण करुन चांगले कार्य करणा-या शिक्षकांच्या पाठीवर कौतूकाची थाप टाकण्यासाठी धनेश्वरी शिक्षण समूहाने शिक्षकरत्न पुरस्कार आज प्रदान केले
डॉ.प्रतापसिंह पाटील  धनेश्वरी शिक्षण समूह महाराष्ट्र, छत्तीसगड
यांचा झाला सन्मान
वरिष्ठ स्तरातून डॉ.दिपक सुर्यवंशी(शि.म.ज्ञानदेव मोहेकर, कळंब),डॉ.शिला स्वामी (माधवराव पाटील महा.मुरुम),प्रशांत भागवत(श्री.कुलस्वामिनी उच्च मा.विद्यालय तुळजापूर)कल्लय्या रुद्रय्या स्वामी(श्रीकृष्ण उ.मा.विद्यालय,गुंजोटी),माध्यमिक स्तरातून चंद्रकांत तांबे(गुरुदेवदत्त हायस्कूल भूम),विक्रम सांडसे व शेषनाथ वाघ (श्रीपतराव भोसले मा.व उ.मा.विद्यालय,उस्मानाबाद),दस्तगीर पठाण(लोकसेवा हायस्कूल गिरवली)
दिपक सोनवणे(जि.प.प्रशाला आरळी.बु.),प्राथमिक स्तरातून बाळासाहेब जमाले (जि.प.कें.शाळा,कसबे तडवळे),प्रशांत जाधवर(जि.प.प्रा.शाळा दसमेगाव ता.वाशी),सुषमा श्रीकांत मसे (जि.प.प्रा.शाळा.बाभळगाव ता.कळंब),रमेश अंबिरकर(संत बोधले महाराज प्रा.शाळा.डिकसळ ता.कळंब) शरद बबन नवले (जि.प.प्रा.शाळा. खानापूर ता.परंडा),मंजुषा स्वामी (जि.प.प्रा.शाळा किणी ता. उस्मानाबाद)विशेष पुरस्कार आश्रुबा कोठावळे(संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मुकबधीर विद्यालय,कळंब) भगवान चौगुले(श्री स्वामी समर्थ मुकबधिर निवासी विद्यालय, उस्मानाबाद),मनोज पवार(क्रीडा)अतुल महाजन(संगणक) यांना कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला तर दिलीप चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यांबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला व जि.प.प्रा.शाळा घारगाव या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.


.
 
Top