उस्मानाबाद/प्रतिनिधी -
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रक्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद व एम्युचार अॅथलेटिक्स असो. उस्मानाबाद जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रक्रीडा स्पर्धेचे जिल्हाधिकारी सौ. दिपा मुधोळ-मुंढे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शानदार उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अॅथलेटिक्स असो. चे  उपाध्यक्ष श्री. संजय बदोले , भारतीय खो खो संघाचे सहसचिव श्री. चंद्रजीत जाधव सर , महाराष्ट्र सायकलिंग संगटनेचे सहसचिव श्री. अभय वाघोलीकर, जिल्हास्तरीय स्कॉश संघटनेचे सचिव श्री. कुलदीप सावंत, श्री. राजाभाऊ शिंदे, श्री. मोहिते लक्ष्मण,  जिल्हा क्रक्रीडा अधिकारी सौ. भाग्यश्री बिले मॅडम, तालुका क्रक्रीडा अधिकारी सारिका काळे मॅडम, क्रक्रीडा भरतीचे उमरगा तालुका अध्यक्ष संजय कोथळीकर, मोहन पाटील,संजय दादा देशमुख, क्रक्रीडा अधिकारी अशोक बनसोडे , क्रक्रीडा अधिकारी कैलास लटके  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी सौ . दीपा  मुधोळ-मुंढे  मॅडम यांनी आपल्या मनोगतात उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला तसेच स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळ हा दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक असून प्रत्यकानी कोणत्यानाकोणत्या खेळात सहभाग नोंदवला पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याचा क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक संपूर्ण देशभर अजून अनेक खेळाडू आपल्या जिल्ह्यातुन तयार व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्यश्री बिले मॅडम होत्या त्यांनी आपल्या मनोगतामध्ये जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रक्रीडा स्पर्धा आयोजकांचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संजय बदोले यांनी या स्पर्धेत कोणकोणत्या क्रीडा बाबी घेतल्या जाणार आहेत व वयोगट सांगून सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्ह्यातील 200 शाळातील 1300 खेळाडूंनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री. बिभीषण पाटील यांनी मांडले या स्पर्धेमधे पंच  म्हणून श्री. राजेंद्र सोलंकर, मोहन पाटील, विवेक कापसे, रामराव साळुंखे, मुनीर शेख, ऐतवडे सर, योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे, ऋषिकेश पाटील, अविनाश थोरबोले, दिनेश माने, राम भुतेकर, विशाल निकम, समीर शेख, हरी खोटे, विशाल जगताप, रमेश मोहिते, अश्विन पवार या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका संयोजक उपस्थितीत होते.
 
Top