लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धा उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियम याठिकाणी  दि 2& व 24 सप्टेंबर रोजी घेण्यात आल्या. क्रक्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यां‘या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा जिल्ह्यात सुरु आहेत. मैदानी स्पर्धेतील तिहेरी उडीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय येथील बारावी विज्ञान शाखेतील संतोष राजेंद्र शिंदे या विद्याथ्र्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. वसंतदादा पाटील हायस्कुल येथील इयत्ता नववी येथील विद्यार्थिनी कु.अपर्णा शिवाजी सूर्यवंशी 800 मी धावणे या स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. 400 मी धावणे या स्पर्धेत सागर बापू कांबळे या इयत्ता सातवी तील विद्यार्थ्याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभे‘छा दिल्या. विजयी विद्याथ्र्यांची क्रीडा मार्गदर्शक नागनाथ पांढरे व प्रा. प्रशांत काळे यांनी मार्गदर्शन केले. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थी व प्रशिक्षकांचे अभिनंदन प्राचार्या श्रीमती उर्मिला पाटील, पर्यवेक्षक भास्कर जाधव, श्रीकांत मोरे, पोर्णिमा घोडके, सुलोचना रसाळ, काकासाहेब आनंदगावकर,
अंकुश शिंदे, प्रा सुनिल बहिरे, प्रा सचिन शिंदे, प्रा विद्यासागर बुवा, प्रा मुकुंद रसाळ, प्रा रामचंद्र खुणे, प्रा उद्धव सोमवंशी यां‘यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे. विभागीय मैदानी स्पर्धा लातूर येथे जिल्हाक्रीडा संकुल याठिकाणी दि 5 आक्टोंबर 2019 रोजी होणार आहेत.

 
Top