उस्मानाबाद/प्रतिनिधी -
शहरातील तेरणा पब्लिक स्कुलच्या १७ वर्षाखालील बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तेरणा पब्लिक स्कुलच्या मैदानावर जिल्हास्तरीय बास्केट बॉल स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत तेरणा पब्लिक स्कुलच्या १७ वर्षाखालील संघाने विजेतेपद पटकावल्याने लातूर येथे होणा-या विभागीय स्पर्धेसाठी हा संघ पात्र झाला आहे. या संघामध्ये अथर्व खुर्द, विश्वजीत होनमाने, संभाजी पवार, वैभव चट्टे, कांचन गोरवे, अरवींद मुलगीर, रोहित पाटील, समीमोईन पठाण, वैभव शिंदे, शिवम मस्के, ओमकार भुरे, ज्ञानेश्वर झोलवर, राजकुमार कांबले, पृथ्वीराज कदम या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना क्रिडाशिक्षक अजिंक्य साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले.या यशबद्दल संस्थेचे अध्यक्ष एल.एल.पाटील, सचिव अनंतराव उंबरे, प्राचार्य शरथकुमार यांच्यासह संस्थेचे सदस्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.