उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा पोलिस दलातर्फे विविध पोलिस ठाणे स्तरावर कोंबिंग ऑपरेशन आयोजित केले होते. यामध्ये पोलिस ठाणे अभिलेखावरील फरारी आरोपी, हिस्ट्रीशीटर, माहितगार गुन्हेगार, अपराधसिध्द झालेले आरोपी, जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरन्ट तसेच पोलिस ठाणे हद्दीत दाखल चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने 222 जणांविरुध्द कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात 23 ते 24 सप्टेंबर दरम्यान पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद येथील जास्तीत जास्त पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दलाचे कर्मचा-यांच्या सहभागने कोंबींग ऑपरेशन करण्यात आले. सदर ऑपरेशन दरम्यान एक पाहिजे आरोपी पकडण्यात आला, 58 अजामीनपात्र व 51 जामीनपात्र वॉरन्टची बजावणी करण्यात आली. तसेच 59 माहितगार गुन्हेगार, 54 हिस्ट्रीशीटर चेक करण्यात आले आहेत.