प्रतिनिधी / तुळजापूर -कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवास रविवारपासून (दि.29) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी विविध विभाग सज्ज झाले आहेत. भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे घाटशीळ रोडवर तात्पुरता दर्शन मंडप उभारण्यात येत असून, सुमारे 300 बाय 200 फुटाच्या या ट्रस मंडपात एकाचवेळी 8 हजार भाविक थंाबू शकतील. या मंडपाचे काम 18 तारखेला सुरू झाले असून, दोन दिवसांत पूर्ण होईल. दरम्यान, एसटी महामंडळाने 26 सप्टेंबर ते 16 ऑगस्ट दरम्यान भाविकांच्या सोयीसाठी 300 बसचे नियोजन केले आहे.
श्री तुळजाभवानी नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक येत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने विभागांना नियोजनाचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे एसटी महामंडळाच्या वतीने जिल्ह्यातील विविध आगारातून जवळपास 300 बसचे नियोजन केले असून गतवर्षापेक्षा 70 बस अधिक आहेत. गतवर्षी एसटी महामंडळाने 230 बसचे नियोजन केले होते. यामध्ये नवरात्रोत्सवात 3 लाख 60 हजार भाविकांची ने-आण करण्यात आली होती. यामुळे एसटी महामंडळाला 2 कोटी 17 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदाही उत्पन्नाबरोबरच नवरात्रोत्सवात भाविकांची ने-आण करण्यासाठी महामंडळाने बसची संख्या वाढवली आहे. तसेच राज्यासह परराज्यातून येणाऱ्या भाविकांची आरोग्याबाबत गैरसोय होऊ नये, म्हणून शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबादच्या वतीने प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा देण्यासाठी तुळजापूर शहरात व ग्रामीण भागात 42 प्रथमोपचार केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. 102, 108 रुग्णवाहिकेची सोय केली आहे. तुळजापूर शहरात 10 व ग्रामीण भागात 10 आरोग्य पथके यात्रा कालावधीत प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी स्थापन करण्यात आली आहेत.