परंडा /प्रतिनिधी:- येथील शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी , प्रदूषण टाळण्यासाठी  महिण्यातून दोन दिवस १ व १५ तारखेला कोणीही आपली मोटारसायकल किंवा कार आणणार नाही तर बसने प्रवास करणार असे सर्वानुमते ठरवले आहे. 
कॉलेजचे प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयात समाजोपयोगी विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी, वातावरणामध्ये होत असलेल्या प्रदूषणामूळे आणि इंधन बचत करण्यासाठी सर्वानी पुढाकार घेऊन महाविद्यालयात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दिनांक १ जूलै रोजी कोणीही वाहन आणले नाही तर सर्वजन आज आपापल्या कामासाठी बसने प्रवास करून आले व गेले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामूळे सर्वत्र कौतूक होत आहे. सकाळी येताना सर्वजन चालत आले. दूपारी जेवनासाठी चालत गेले व ड्यूटी संपल्यानंतर बसनेच जाण्यासाठी सर्वजन चालत गेले. एक चांगला सकारात्मक दृष्टिकोन बाळगून महाविद्यालयाने राष्ट्रीय कार्यास सहकार्य केल्यामूळे शहरामध्ये नव्हे तर देशामध्ये एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.सर्वच कार्यालयातील कर्मचार्‍यांनी अशाच प्रकारचे राष्ट्रीय कार्य करून देशाच्या विकासात भर घालावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूढेही असेच राष्ट्रीय कार्य करून हे महाविद्यालय विविध अंगी आपला ठसा उमटविणार यात शंका नाही.
 
Top