कळंब /प्रतिनिधी-
आपल्या लहान मुलाचा वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी मोठया हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. मात्र कळंब येथील आसिफ मुलाणी यांनी आपला दोन वर्षाच्या आयेशा नामक मुलीचा वाढदिवस डिकसळ येथील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील गरीब व गरजू मुलांना कंपास,पेन, वह्या ,शाळेला झाडं व मुलांना खाऊ वाटप करुन साजरा केला आहे . आसिफ मुलाणी हे पर्याय सामाजिक संस्था कळंब येथे अकाउंटंट या पदावर कार्यरत आहे. या कार्यक्रमासाठी भिकाजी जाधव, बालाजी शेंडगे, सुनिल कांबळे,आसिफ मुलाणी, महेश गडकर, सुहास पांचाळ,वैभव घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मुलीचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार मुलाणी दाम्पंत्याच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी संत बोधले महाराज शाळेतील ३५ विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी लहानग्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक निकम पोपट सहशिक्षक प्रदीप यादव, किशोर वाघमारे, सज्जन बर्डे, रमेश अंबिरकर,नामदेव राऊत, नामदेव झाडे ,सुरज राउत व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वाघमारे यांनी केले तर आभार प्रदीप यादव यांनी मानले.
