*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जेन्नोती करण्यासाठी सन २०१९-२० या वित्तीय वर्षासाठी राज्य सरकारने जिल्ह्यातील १३३.०१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ९७ कोटी ८० लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांनी दिली आहे*.
उस्मानाबाद जिल्ह्यातील १३३.०१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जिल्ह्यातील ६५ प्रमुख राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग यासाठी हा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये भूम तालुक्यातील १०, परंडा तालुक्यातील १३, उस्मानाबाद तालुक्यातील ११, तुळजापूर तालुक्यातील २१, उमरगा तालुक्यातील ५ व कळंब तालुक्यातील ५ अशा एकुण ६५ रस्त्यांसाठी हा निधी मंजूर झाला आहे. *जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जाणार्या या रस्त्याच्या सुधारणेसाठी राज्य सरकारने भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर* यांचे जिल्हा भाजपाच्यावतीने भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का. सदस्य नितीन काळे, अँड. मिलिंद पाटील, अँड. खंडेराव चौरे, अँड. अनिल काळे, सुधीर पाटील, अँड. व्यंकटराव गुंड यांनी आभार व्यक्त केले आहेत.