उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हयात ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते. परंतू सध्या पाण्यामुळे ऊस लागवड ही कमी लागवड झालेली आहे. नगदी पीक म्हणून शेतक-यांनी आता आंब्याची लागवड करावी, उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्हयातील हवामन व जमिन आंबा या फळासाठी पोषक आहे, त्यामुळे शेतक-यांनी आंब्याची लागवड मोठया प्रमाणात करावी, अशी माहिती उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट फार्मर्स फुड प्रोड्युसर कंपनी लि., चे चेयरमन अमोल पाटोदेकर यानी पत्रकार परिषदेत दिली.
उस्मानाबाद शहरात दि.१६ मे रोजी आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमोल पाटोदेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. अधिक माहिती देताना पाटोदेकर यांनी सांगितले की, कंपनीने सघन आंबा लागवड या तंत्रज्ञानावर आधारित आंबा लागवड ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था याची एक साखळी निर्माण करावयाचे नियोजन केले आहे. यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत कंपनीच्या उद्दीष्टांबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी लागणा-या सर्व सेवा कंपनीमार्फत एकाच छताखाली २४ तास ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच अत्याधुनिक शेती उपयोगी अवजारे, उपकरणे, औषधे शेतक-यांना त्यांच्या मागणीनुसार रास्तदरात पुरवठा करण्यात येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी व आंबा उत्पादकांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांचे विचारांचा लाभ घेवून, आपण आपल्या व्यावसायीक शेतीमध्ये आंबा या पीकाचा समावेश करावा व स्वताचा, कुटूंबाचा गावाचा व पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. अमोल पाटोदेकर यांनी केले आहे.
जिल्हयात ऊस हे प्रमुख पीक घेतले जाते. परंतू सध्या पाण्यामुळे ऊस लागवड ही कमी लागवड झालेली आहे. नगदी पीक म्हणून शेतक-यांनी आता आंब्याची लागवड करावी, उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्हयातील हवामन व जमिन आंबा या फळासाठी पोषक आहे, त्यामुळे शेतक-यांनी आंब्याची लागवड मोठया प्रमाणात करावी, अशी माहिती उस्मानाबाद डिस्ट्रीक्ट फार्मर्स फुड प्रोड्युसर कंपनी लि., चे चेयरमन अमोल पाटोदेकर यानी पत्रकार परिषदेत दिली.उस्मानाबाद शहरात दि.१६ मे रोजी आंबा प्रदर्शन व मार्गदर्शन मेळावा आयोजित केला आहे. त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमोल पाटोदेकर यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. अधिक माहिती देताना पाटोदेकर यांनी सांगितले की, कंपनीने सघन आंबा लागवड या तंत्रज्ञानावर आधारित आंबा लागवड ते काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था याची एक साखळी निर्माण करावयाचे नियोजन केले आहे. यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत कंपनीच्या उद्दीष्टांबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी लागणा-या सर्व सेवा कंपनीमार्फत एकाच छताखाली २४ तास ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच अत्याधुनिक शेती उपयोगी अवजारे, उपकरणे, औषधे शेतक-यांना त्यांच्या मागणीनुसार रास्तदरात पुरवठा करण्यात येणार आहेत.
तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी व आंबा उत्पादकांनी या मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी आवाहन करताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व त्यांचे विचारांचा लाभ घेवून, आपण आपल्या व्यावसायीक शेतीमध्ये आंबा या पीकाचा समावेश करावा व स्वताचा, कुटूंबाचा गावाचा व पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. अमोल पाटोदेकर यांनी केले आहे.