उस्मानाबाद/ प्रतिनिधी-
खरीप २०१७ मध्ये उस्मानाबाद व लोहारा तालुक्यात प्रशासनाने केलेल्या चुकांची खरीप २०१८ मध्ये पुन्हा एकदा पुनरावृत्ती केल्याने भूमवाशी व  उमरगा  तालुके सोयाबीन पिकाच्या विम्यापासून वंचित राहिले आहेत.सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून जास्त पेरा असल्याने मंडळ घटक गृहीत धरण्याची अनेक वेळा मागणी करण्यात आली होती. परंतु मंडळ घटक धरण्या ऐवजी गतवर्षी प्रमाणे पुन्हा एकदा तालुका घटक धरून मूलभूत चूक करण्यात आली आहे.
तालुका घटक धरल्यास नियमाप्रमाणे १६ पीक कापणी प्रयोग करणे अपेक्षित असताना वाशी तालुक्यामध्ये १२ च पीक कापणी प्रयोग करण्यात आलेले आहेत,त्यापैकी केवळ ३ प्रयोगा मधील उत्पन्न हे उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त दर्शविण्यात आलेले आहे. पीक कापणी प्रयोग अहवालावरती स्वाक्षरी करताना सरपंचपोलीस पाटील व इतर उपस्थितांनी आलेल्या उत्पन्नाची खातरजमा करूनच स्वाक्षरी करावी असे वेळोवेळी विविध माध्यमांद्वारे सूचित करण्यात आले होते. वाशी तालुक्यातील तिन्ही पीक कापणी प्रयोगाचा अहवाल उपलब्ध करून घेण्यात येत आहे व याचा बारकाईने अभ्यास करून अनियमितता शोधण्यात येणार आहेत. इतर दोन तालुक्यांची देखील माहिती संकलित करणे सुरु आहे.
महसूल व कृषी विभागाच्या चुकांमुळे उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील ७५००० शेतकरी खरीप २०१७ मधील सोयाबीन पिकाच्या विम्यापासून वंचित आहेत. या चुका मा. मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका मान्य करत या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केल्याचे जाहीर केले होते. परंतु कदाचित राजकीय कारणांमुळेसरकारने मा. उच्च न्यायालयात विरुद्ध भूमिका घेत विमा देण्यास नकार दिला होता.  सध्या हे प्रकरण मा. उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असून उस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयीन लढा कायम ठेवण्यात येणार आहे.
ज्याप्रमाणे आम्ही उस्मानाबाद व लोहारा तालुक्यासाठी पूर्ण ताकतीने लढत आहोतत्याचप्रमाणे भूम,वाशी व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी मंत्री आ. मधुकरराव चव्हाण साहेबमाजी राज्यमंत्री आ. बसवराज पाटील साहेबआ. राहुल मोटे साहेब यांच्यासह काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते लढा उभारणार असून इतर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील एकत्रितपणे प्रयत्न करणे योग्य राहीलअसे मत आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी व्यक्त केले आहे.
Attachments area
 
Top