प्रतिनिधी /उस्मानाबाद
जिल्ह्यातून हज यात्रा २०१९ साठी एकूण २०० हज यात्रेकरू जाणार आहेत. या यात्रेकरुंसाठी सोमवारी (दि.२२) उस्मानाबादेत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर अंजुमन खुद्दाम कमिटीच्या वतीने शहरातील उलुम अरबी शाळा येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालणार असून यामध्ये मौलाना मुफ्ती, बीड हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शििबराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा हाजी ट्रेनर अलहज असगल अलिखाँ व अलहज सबदर हुसेनसाब यांनी केले आहे. 
 
Top