धाराशिव (प्रतिनिधी)- येथील येथील करंडे परिवारातील सहा जणांचा भीषण लागलेल्या आगीत मृत्यू झाला. पहाटे 2.40 वाजता आग लागली. ग्रामस्थांनी लगेच धाराशिव नगर परिषदेच्या अग्निशमन दलास फोनवरून माहिती दिली. तरी सुध्दा गाडी पहाटे 5 वाजता आली. अग्निशमन दलाच्या गाडीमध्ये अपुरे पाणी आणि अपुरे डिझेल, ऑक्सिजन मास्क नसल्यामुळे गुदमरलेल्या व्यक्तींचे जीव वाचवता आले नाहीत. अशी प्रतिक्रिया आमदार प्रतापसिंह पाटील यांनी येडशी येथील घटनेच्या भेटीनंतर दिली आहे.
या संदर्भात आपण जिल्हाधिकारी यांना माहिती दिली असून, या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. या संदर्भातील प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित करणार असल्याची माहिती आमदार प्रतापसिंह पाटील यांनी दिली. यावेळी त्यांनी दुर्दैवी घटनेमुळे सहा जणांचे जीव गेले. अग्निशमन दलाची गाडी लवकर आली असती तर काही जीव वाचले असते असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
