तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिवाळी पाडव्या दिनी  शुभेच्छा देत तुळजाभवानी मातेच्या चरणाचे कुंकु देविची प्रतिमा आणि कवड्याची माळ भेट;

महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बापू जगदे यांनीभेट देऊन शुभेच्छा दिल्या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गुजरातमधील अहमदाबाद येथील थलतेज परिसरातील निवासस्थानी  ही भेट झाली. या सदिच्छा भेटीदरम्यान बापू जगदे यांनी धाराशिव जिल्ह्याची ओळख आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या श्री तुळजाभवानी मातेची आकर्षक प्रतिमा तसेच देवीच्या भक्तीचे प्रतीक असलेली कवड्याची माळ भेट देऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सन्मान केला. शहा यांनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला.


 
Top