तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र ॲटोमोबाईल्स सव्हीसिंग सेंटरला आग लागून प्रचंड नुकसान झाले.

तेर येथील शेअरअली चॅदखा पठाण यांच्या महाराष्ट्र ॲटोमोबाईल्स सव्हीसिंग सेंटरला 12 नोव्हेंबरला सायंकाळच्या सहाच्या सुमारास आग लागून गॅरेजमधील अनेक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.महाराष्ट्र ॲटोमोबाईल्स सव्हीसिंग सेंटरच्या शेजारी असलेल्यानी केरकचरा गोळा केलेला पेटवून दिल्याने आगीची कुलती पेट घेतघेत महाराष्ट्र ॲटोमोबाईल्स सव्हीसिंग सेंटरच्या दुकानाला आग लागल्याने दुकानातील ऑईलने पेठ घेतल्याने दुकानातील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.


आग सायंकाळी सहाच्या दरम्यान लागली.आग लागल्यावर खाजगी पाण्याच्या टॅकरने आग विजवण्यात आली.


तेर येथील महाराष्ट्र ॲटोमोबाईल्स सव्हीसिंग सेंटरला सायंकाळी सहाच्या दरम्यान आग लागून नागरीकानी आग विझली परंतू अग्निशमक दलाची गाडी आग विझवल्यावर सहा वाजून अठ्ठावण मिनीटानी घटनास्थळी आली.

 
Top