धाराशिव (प्रतिनिधी)- दिवाळी पहाट.... अविस्मरणीय संगीत पर्वणी...... पहाटेच्या शांत थंड वातावरणात सुरेल मैफिलीने धाराशिव चे संगीत प्रेमी स्वरात न्हाऊन निघाले..पं.पुरुषोत्तम जोशी यांच्या छोटाख्याल,अभंग,नाट्यसंगीत गायनाने धाराशिवकर त्रृप्त झाले. उज्वल निर्माण फाउंडेशन द्वारे या संगीत मैफीलीचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला राग भैरव मधे छोटा ख्याल सादर करुन पंडित पुरुषोत्तम जोशी यांनी गायनाला सुरुवात केली.त्यानंतर रेवती आणि बैरागी रागातील ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या संत एकनाथ महाराज यांच्या अजरामर गाण्याने अभंग गायनाला सुरुवात केली. नंतर संत तुकाराम महाराज यांच्या येई गा तू माय बापा हा अभंग त्यानंतर ओम नमो हा सुर जीथे रंगतो,..सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केलेल्या या यमन रागातील दशरथ पुजारी यांनी संगीत दिलेल्या रमेश अनावकर यांच्या गीतांवर प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्या वाजवून पसंती दाखवली. नंतर संत एकनाथ महाराज यांच्या माझे माहेर पंढरी या राम फाटक यांनी संगीतबध्द केलेल्या भूप रागातील अप्रतिम सादरी करणानंतर राग आसावरी आणि जौनपुरी वरती आधारित संत गोरा कुंभार या नाटकातील पं .अभिषेकी बुवांनी संगीतबद्ध केलेल्या अशोकजी परांजपे यांच्या अवघे गरजे पंढरपूर या आसावरी आणि जौनपुरी रागातील नाट्य पद सादर करण्यात आले .या नंतर नाट्यसंगीता मधून..देव दिना घरी धावला या नाटकातील उठी उठी गोपाला हे बाळ कोल्हटकर यांच्या कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांच्या मुळ गाण्याचे गायन करुन राग भुप आणि देसकार रागातील हे पद अत्यंत तयारीने पं.पुरुषोत्तम जोशी व कंन्या रागीणी जोशी यांनी अप्रतिम सादर केले.याला हार्मोनियम वर लिंगे यांनी साजेशी अशी अप्रतिम साथ संगत केली. यानंतर हार्मोनियम बासरी व पखावज यांची जुगलबंदी धाराशिवकरांनी प्रथमच अनुभवली पं दीपक लिंगे यांनी हार्मोनियम मधून काढलेल्या सुरावटीमुळे वातावरण भारावून गेले. रसिकांनी भरभरून या जुगलबंदीला दाद दिली. नंतर श्रीनिवास खळे यांच्या संगीत संयोजनातील बाजे मुरलीया बाजे हे पटदीप रागातील गीत सादर करण्यात आले. त्यानंतर जय जय गौरीशंकर या नाटकातील नारायणा रमा रमणा हे वसंत देसाई यांनी संगीत दिलेल्या नाट्य गीताच्या सादरी करणार नंतर शेवटी सजल नयन नीत धार बरसती या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. अत्यंत चोखंदळ गाणी, दर्जेदार रसिक भाराऊन टाकणारे पहाटेचे सुंदर वातावरणात अत्यंत सुरेख सादरीकरनाणे कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात पखवाज सूरेश वाघमारे, तबला प्रदीप सुतार, बासरी जगदीश सुतार, टाळ अम्रृत जावळे, तानपुरा ऋषभ जोशी आणि रागीणी यांनी अप्रतिम साथसंगत केली. कार्यक्रमाचे खुमासदार व तितक्याच ताकतीचे निवेदन धनंजय कुलकर्णी यांनी केले. एकुण अत्यंत आखीव रेखीव हा कार्यक्रम धाराशिव येथील संगीत प्रेमींना ऐकायला मिळाला. धाराशिव चे संगीतरत्न म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मभूषण पंडित सी.आर.व्यास संगीत महाविद्यालय धाराशिवचे संस्थापक पं दिपक लिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी पणे संपन्न झाला. या कार्यक्रमाला उपस्थित संगीत प्रेमींनी भरभरून दाद दिली.उज्वल फाउंडेशन चे क्रृष्णा साळुंखे आणि विवेक देशमुख यांच्या संपूर्ण टीमने अत्यंत सुरेख आयोजन केले.
