तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे श्री संत बाळूमामा यांच्या 134 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मंगलमय सोहळा 23 ऑक्टोबरला खंडोबा मंदिर, तेर (पेठ) येथे मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी श्रींच्या प्रतिमेच्या पूजनाने होईल. दुपारी ठीक 3 वाजून 23 मिनिटांनी श्रींच्या पालखीवर फुले आणि भंडाऱ्याची उधळण करण्यात येणार आहे. सायंकाळी ठीक 7 वाजता श्रींची महाआरती होईल. आणि रात्री ठीक 8 वाजता  बालकीर्तनकार हभप. प्रणव महाराज तोर( टाकळीकर )यांच्या कीर्तनाचा भक्तिमय सोहळा रंगणार आहे. या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती  बालगायिका हभप. सृष्टी तोर आणि युवा कीर्तनकार हभप. श्रावणी तोर यांची  राहणार आहे. तरी तेर व परिसरातील भाविकभक्तांनी आपल्या कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत बाळूमामांच्या 134 व्या जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


 
Top